आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:साठी वेळ द्यायला अनेकांना जमत नाही.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

भारतीय खाद्यसंस्कृतीत मसाल्यांशिवाय जेवण अपू्र्ण समजले जाते.

Image Source: pexels

जलद चयापचय आणि वजन कमी करणे हे मसाले अनेक मार्गांनी फायदेशीर आहेत.

Image Source: pexels

आज आपण अशा काही मसाल्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जे चयापचय म्हणजेच मेटाबॉलिज्म जलद होण्यास मदत करू शकतात.

Image Source: pexels

काळी मिरी-

काळी मिरीमध्ये पाइपरिन नावाचे एक संयुग असते, ज्यामुळे जास्त कॅलरी बर्न करण्यात आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Image Source: pexels

हळद-

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते. हळद चयापचय गतिमान करते, ज्यामुळे कॅलरी बर्न करणे सोपे होते.

Image Source: pexels

आले-

आल्यामध्ये जिंजरॉल असते, जे मेटाबॉलिक रेट वाढवते. हे तुमच्या शरीराला अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते .

Image Source: pexels

लवंग-

लवंगमध्ये युजेनॉल नावाचे संयुग असते, जे तुमच्या शरीरातील चयापचय गती वाढवू शकते.

Image Source: pexels

दालचिनी-

दालचिनीमध्ये सिनामल्डीहाइड असते, ज्यामुळे तुमची चयापचय जलद होते. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

Image Source: pexels

जिरे-

जिरे- जिऱ्यामध्ये थायमॉल आढळते, ज्यामुळे तुमची चयापचय जलद होते.

Image Source: pexels