जगातील अनेक श्रीमंत लोकांची घरे थक्क करणारी आहेत. अनेकांची घरे ही अलिशान राजवाड्यांसारखी घरे आहेत.
पण तुम्हाला जगातील सर्वात महागडी घरे माहित आहेत का? जाणून घेऊयात महागड्या घरात अँटिलियाचा कितवा नंबर लागतो.
लंडनमध्ये बांधलेले हे घर युनायटेड किंगडमच्या राजघराण्याची मालमत्ता आहे. बकिंगहॅम पॅलेस हा 1703 मध्ये बांधला आहे. बकिंगहॅम पॅलेसची किंमत 490 कोटी डॉलर एवढी आहे.
मुकेश अंबानी यांनी मुंबईत हे 27 मजली घर बांधले आहे. त्याची किंमत 200 कोटी डॉलर एवढी आहे. या घरात 3 हेलिपॅड, 168 कार गॅरेज, स्विमिंग पूल, थिएटर, स्नो रूम देखील आहे.
व्हिला लेस सेड्रेस हे घर फ्रेंच रिव्हिएरा वर स्थित आहे. हे 1830 मध्ये बांधले गेले. त्याची किंमत 45 कोटी डॉलर असल्याचे सांगण्यात येत आहे.
फ्रान्समधील कान्सजवळ बांधलेले आणि बबल पॅलेस म्हणून ओळखले जाणारे हे घर 1989 मध्ये पूर्ण झाले. त्याची किंमत 42 कोटी डॉलर असल्याचे सांगितले जात आहे.
मोनॅकोजवळ हे आलिशान घर 2015 मध्ये बांधण्यात आले होते. त्याची किंमत सुमारे 33 कोटी डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे.
लाँग आयलंड न्यूयॉर्क येथे असलेल्या या घराची किंमत अंदाजे $250 दशलक्ष आहे. ते 2003 साली पूर्ण झाले.
लंडनच्या लक्षाधीश क्षेत्र केन्सिंग्टनमध्ये बांधलेल्या या घराची किंमत सुमारे 220 दशलक्ष डॉलर्स आहे.
ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक लॅरी एलिसन यांच्या या घराची किंमत सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स आहे. त्याची वास्तुकला जपानपासून प्रेरित आहे. येथील बागा पाहण्यासारख्या आहेत.