हायपरपिग्मेंटेशन ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे बहुतेक लोक त्रासलेले असतात.
जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्याने मेलेनिन वाढते आणि त्वचा टॅन होऊ शकते यामुळे हायपरपिग्मेंटेशन वाढते.
एलोवेरामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते, जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचा गोरी बनवते.
पपईमध्ये पपेन हे एन्झाइम असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते आणि त्वचेच्या मृत पेशी काढून पिगमेंटेशन कमी करते.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते. लिंबाचा रस बेसनमध्ये मिसळून त्वचेवर लावल्याने हायपर पिग्मेंटेशनपासून मुक्त होण्यासाठी मदत होते.
टोमॅटो आणि हळदीचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने पिगमेंटेशनपासून लवकर आराम मिळेल.
हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, जे पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करतात.
हळद दही किंवा दुधात मिसळून चेहऱ्याला लावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.
काकडीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात, जे पिगमेंटेशन कमी करण्यास आणि त्वचेला शांत करण्यास मदत करतात.