मान्सूनची चाहूल लागली असून ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या सुरुवातीला वीज पडून (Lightning) नुकसानीच्या घटना पाहायला मिळत आहे. वीज चमकताना मोबाईल फोन न वापरण्यामागचं कारण काय? जाणून घ्या. बहुतेक वेळा लोक पावसात मोबाईल फोन वापरत असताना त्यांच्यावर वीज कोसळल्याचं समोर आलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आपण मोबाईल फोन वापरतो, तेव्हा तो अतिनील किरणे वेगाने उत्सर्जित करतो. अतिनील किरण (UV rays) विजेला स्वतःकडे वेगाने आकर्षित करतात. एका वैद्यकीय जर्नलमध्ये यासंबंधित माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. मोकळ्या आकाशात मोबाईल फोन वापरु नये. विजा चमकताना घरातही टीव्ही, फ्रीज, कुलर, स्मार्ट टीव्ही अशी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणं टाळावे आणि ती बंद ठेवावीत. पावसाळ्यात विद्युत खांब देखील कंडक्टर म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा.