आपण लग्न म्हणजे सात जन्मांचं नातं समजतो, पण काही देशांत लग्न फक्त काही दिवसांचं करार बनलं आहे. यात प्रेम नाही, तर व्यवहार असतो.
दक्षिण-पूर्व आशियात काही ठिकाणी पर्यटकांसाठी काही काळासाठी बायका दिल्या जातात. ट्रिप संपली की घटस्फोट होतो – इतकं सोपं आणि धक्कादायक!
इंडोनेशियात ‘प्लेझर मॅरेज’ म्हणजे एक मोठा उद्योग बनला आहे. गरीब कुटुंबातील स्त्रिया या व्यवस्थेत अडकतात, काही वेळा आपल्या इच्छेविरुद्ध.
पैशासाठी किंवा घरच्यांच्या दबावामुळे अनेक महिला सुखविवाह स्वीकारतात. काहींसाठी हा पर्याय असतो, तर काहींसाठी छळाचा मार्ग!
इथे दलाल पर्यटकांना त्यांच्या पसंतीनुसार स्त्रिया पुरवतात. अशा विवाहांना सामाजिक मान्यता नाही, पण व्यवस्था डोळेझाक करते.
17 व्या वर्षी कहायाने पहिल्यांदा पर्यटकाशी सुखविवाह केला. बदल्यात 840 डॉलर्स मिळाले, पण त्याचं आयुष्य मात्र तुटकं झालं.
कहायाचं पहिले लग्न 13 व्या वर्षीच झालं होतं आणि तिच्या मुलीसह तिला एकटी सोडलं गेलं. जगण्यासाठी प्लेझर मॅरेजचं चक्र सुरू झालं.
एका कराराने कहाया सौदी अरेबियात गेली, पण तिथे तिला गुलामासारखी वागणूक मिळाली. न पैसा, न सन्मान – फक्त पीडा!
कहायाने 15 पेक्षा जास्त पुरुषांशी लग्न केलं, पण प्रत्येकवेळी ती फक्त एक उपलब्ध सेवा बनून राहिली. यात नातं नव्हतं, फक्त तडजोड होती.
‘प्लेझर मॅरेज’ ज्या उद्देशाने सुरू झाले, त्याचं वास्तव फार वेगळं आहे. यात प्रेम हरवलंय आणि माणुसकी देखील!