माऊलींच्या पालखीचे दिवेघाटातील नयनरम्य दृश्य!

Published by: जयदीप मेढे
Image Source: Swapnil Barge

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने दिवे घाट पार केला आहे.

Image Source: Swapnil Barge

विठू नामाचा जयघोष आणि टाळ्या मृदंगाच्या गजराने दिवे घाट दुमदुमून गेला.

Image Source: Swapnil Barge

सुंदर छायाचित्र कॅमेऱ्यात टिपले आहेत स्वप्नील बर्गे यांनी!

Image Source: Swapnil Barge

पावसाळ्याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंग भेटीची.

Image Source: Swapnil Barge

दिवे घाट पार करून वारकऱ्यांची पावले पंढरीकडे

Image Source: Swapnil Barge

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आज हजारो वारकऱ्यांची पाऊले दिवे घाटात चालताना पाहायला मिळाली.

Image Source: Swapnil Barge

निसर्ग सौंदर्याने नटलेला, हिरवळीने सुंदर सजलेला दिवे घाट टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमला होता.

Image Source: Swapnil Barge

संत तुकाराम महाराजांची पालखी देहुतून तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरीच्या दिशेने निघाल्या असून इतरही मानाच्या पालख्या रवाना झाल्या आहेत.

Image Source: Swapnil Barge

प्रत्येक जिल्ह्यात या पालख्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे.

Image Source: Swapnil Barge