तुम्हाला धुम्रपान करण्याची सवय असेल तर तुम्ही ती सवय सोडली पाहिजे. परंतु, ते सोडणे कठीण होऊ शकते. धूम्रपान सोडण्याची अनेक कारणे आहेत. धूम्रपान केल्याने तुमच्या प्रियजनांवर ही तितकाच परिणाम होत असतो. धुम्रपान सोडण्याचे फायदे जाणून घ्या. धुम्रपान सोडल्यानंतर तुमचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सामान्य राहतात. खोकला आणि दम लागण्याचा त्रास कमी होतो. धुम्रपान सोडल्यानंतर कॅन्सरचे प्रमाण कमी होते. तुमची बोटे आणि नखे हळूहळू कमी पिवळी दिसतील. तुमचे पिवळे झालेले दात हळूहळू पांढरे होऊ शकतात. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)