सुंदर, लांब आणि चमकदार केसांसाठी तुम्हाला बाजारातील महागडे प्रोडक्ट्स किंवा पार्लर ट्रिटमेंटची गरज नाही.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

तुम्ही फक्त पाण्यात काही गोष्टी मिसळून त्याचा केसावर वापर केल्याने तुमच्या केसासंबंधित सर्व समस्या दूर होतील.

Image Source: pexels

कॉफी (Coffee For Hair)

एका छोट्या वाटीत किंवा भांड्यात पाणी घ्या आणि त्यात कॉफी पाण्यात मिसळा.

Image Source: pexels

शॉम्पूनंतर या कॉफीच्या पाण्याने केस धुवा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. 15 मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर तुमच्या केसांचा छान चमक येईल.

Image Source: pexels

मध (Honey)

केस चमकदार करण्यासाठी पाण्यात मध मिसळा. एक मग पाण्यात तीन ते चार चमचे मध टाका.

Image Source: pexels

या पाण्याने केस धुवा आणि 5 ते 10 मिनिटे राहू द्या. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने केस चांगले धुवा.

Image Source: pexels

कडुलिंब (Neem)

कोरड्या टाळूपासून किंवा कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंब खूप फायदेशीर आहे.

Image Source: pexels

कडुलिंबाची पाने गरम पाण्यात काही वेळ उकळू द्या, हे पाणी नंतर थंड करा. या पाण्याने केस धुवा

Image Source: wikipedia

ॲपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

टाळूवर साचलेल्या घाणीमुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. केसांची ही समस्या दूर करण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरेल.

Image Source: pexels

एक कप पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगरच्या दोन ते तीन चमचे मिसळा. शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने धुवा.

Image Source: pexels