मनुक्यांचे आरोग्यदायी रहस्य जाणून घ्या!

Published by: जगदीश ढोले
Image Source: PINTEREST

व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक तत्त्वे मनुकामध्ये आढळतात.

Image Source: PINTEREST

मनुका खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. काहींना सुके मनुके खायला आवडतात तर काहींना भिजवलेले मनुके खातात. चला जाणून घेऊया मनुके भिजवून खावे की कोरडे मनुके खावेत.

Image Source: PINTEREST

कोरडे आणि ओले दोन्ही मनुके आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण कोरड्या मनुकापेक्षा भिजवलेले मनुके जास्त फायदेशीर मानले जातात.

Image Source: PINTEREST

भिजवलेल्या मनुकामध्ये भरपूर फायबर असते जे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Image Source: PINTEREST

भिजवलेल्या मनुकामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला आतून मजबूत करण्यास मदत करतात.

Image Source: PINTEREST

सुक्या मनुका फायबर आणि त्वरित ऊर्जा घटकांनी समृद्ध असतात. कोरडे मनुके खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी सुक्या मनुका खूप प्रभावी ठरतात.

Image Source: PINTEREST

भिजवलेले मनुके खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. पचनक्रिया मजबूत असेल तर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

Image Source: PINTEREST

भिजवलेल्या मनुकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन असते जे हाडे निरोगी बनवण्यास मदत करतात. रोज भिजवलेले मनुके खाल्ल्याने हाडांशी संबंधित समस्या दूर होतात.

Image Source: PINTEREST

भिजवलेल्या मनुकामध्ये नैसर्गिक साखर कमी असते, त्यामुळे मधुमेही रुग्ण कमी प्रमाणात भिजवलेल्या मनुका खाऊ शकतात.

Image Source: PINTEREST

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: PINTEREST