चेहऱ्याला बटाट्याचा रस लावण्याचे अनेक फायदे आहेत.
तुम्ही तुमच्या दैनंदिन स्कीनकेअरमध्ये बटाट्याचा वापर करू शकता.
चेहरा उजळवण्यासाठी बटाट्याचा रस एक चांगला पर्याय आहे.
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, पोटॅशियम आणि फ्लेव्होनॉइड्स असते जे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते.
बटाट्यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात जे आपल्याला दीर्घकाळ तरुण ठेवतात.
नियमितपणे बटाट्याचा रस चेहऱ्याला लावल्याने मुरूम, पिगमेंटेशन, काळे डाग यासारख्या समस्या दूर होतात.
बटाट्याचा रस डोळ्याखालील काळी वर्तुळ घालवण्यास फायदेशीर ठरतो.
बटाट्यामध्ये अॅझेलेइक अॅ सिड असते जे चेहऱ्यावरील मुरूम आणि लालसरपणा काढून टाकते.
रात्री झोपताना बटाट्याचा रस चेहऱ्याला लावल्यास चेहरा चमकदार होण्यास मदत होते.
बटाट्याचा रस चेहऱ्याला लावण्यासाठी सर्वप्रथम 1 बटाटा खिसुन घ्या. मग ते पिळून त्याचा रस काढा, आणि कापसाच्या सहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा धुवा.