दिवसभरात किती लिटर पाणी पिले पाहिजे? जाणून घ्या भरपूर पाणी पिण्याचे महत्व संपूर्ण दिवसात शरीर हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करणे गरजेचे अहे. पाणी पिण्याचे अनेक फायदे असतात. संपूर्ण दिवसभरात मनुष्याला किती लिटर पाण्याचे सेवन केले पाहिजे? पुरुषांनी 4 लिटर तर स्त्रीयांनी 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसभरात आवश्यकतेनुसार पाणी पिल्यास शरीरातील अनावश्यक घटनांन बाहेर टाकण्यास मदत होते. सकाळी उठून सर्वप्रथम पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो सकाळी उठल्याबरोबर कमीत कमी दोन ग्लास पाणी प्यावे, असे केल्याने चयापचय आणि पचनक्रिया वाढते. पाण्यामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते. निस्तेज त्वचा सुधारते. सतत पाणी पिणे हे व्यक्तीला वारंवार आजारी पडण्याच्या समस्येपासून देखील वाचवू शकते. नियमित पाणी प्यायल्याने केसाचे सौंदर्य सुधारते. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. भरपूर पाणी पिण्याने मेंदू तजेलदार राहतो. पाणी पिण्याने एकाग्रता वाढते, मनाची चंचलता शांत होण्यास मदत होते, रागावर नियंत्रण मिळवता येते. झोपण्यापूर्वी काही मिनिटांआधी पाणी पिण्याने मूड चांगला राहतो आणि झोप पण चांगली लागते. पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे सर्वात चांगले माध्यम आहे. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )