स्त्रिया घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या निभानताना दिसतात. मुलं आणि कुटुंबाची पूर्ण काळजी घेताघेता स्त्रिया स्वत:कडे लक्ष देत नाहीत. महिलांना अनेक ताणतणावाचा सामना करावा लागतो. स्वत:ला फिट आणि निरोगी कसे ठेवता येईल, याची चिंता त्यांना सातत्याने सतावत असते. स्त्रिया कुटुंबातील सर्व सदस्यांच्या खाण्या पिण्याची दखल घेते, परंतु तीला स्वत: च्या खाण्या पिण्याची दखल घेण्यासाठी वेळ देता येत नाही. महिला आपल्या नाष्ट्यात अंडी, दूध, संपूर्ण धान्य किंवा फळे इत्यादींचे सेवन करू शकतात. महिलांनी नाष्ट्यात फायबर, प्रथिने आणि कार्बचा समावेश करावा. महिला दुपारच्या जेवणात बाहेरचे जेवण खातात. इतकंच नाही तर महिलांना बाहेरचे स्नॅक्सचे सेवन करतात. सतत जंक फूडचे सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ हा ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून काम करण्यात जातो. यामुळे त्यांना कंबर, पाय दुखी सारखे आजार होऊ शकतो. तसेच बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्यास इतरही समस्या वाढू शकतात. दर तासाला ५ मिनिटांचा ब्रेक घेऊन हवं असल्यास खर्चावर बसून हलका व्यायामही करू शकता. विश्रांती घेतल्याने तुम्हाला ऊर्जावान वाटेल, तसेच निरोगीही राहाल. जर तुम्ही दररोज पुरेसे पाणी पित असाल तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल आहे. महिला पाणी पिणं विसरतात,अशावेळी त्यांना डिहायड्रेशनला सामोरे जावे लागू शकते. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नोकरदार महिलांनी आपल्या जीवनशैलीत व्यायाम किंवा योगाचा ही समावेश केला पाहिजे. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )