भारतात तुम्हाला अनेक प्रकारचे आंबे आढळतील. आंबा हे एक रसाळ चविष्ट फळ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
काही लोक उन्हाळ्याची वाट फक्त आंबे खायला मिळतील म्हणून पाहतात.
म्हणूनच ज्यांना आंबे खायला आवडतात त्यांना हा ऋतू खूप आवडतो. कारण या ऋतूत मिळणारे ताजे आंबे खाण्याचा आनंद वेगळाच असतो.
आंबा केवळ चवीच्या बाबतीतच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप चांगला मानला जातो.
आंब्याला फळांचा राजा म्हणतात. आणि या हंगामात मिळणारे ताजे आंबे काही वेगळेच आहेत. भारतात तुम्हाला अनेक प्रकारचे आंबे आढळतील.
आंब्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फोलेटसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात.
आंबा हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकते.
आंब्यामध्ये आढळणारे ग्लूटामाइन अॅसिड स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करू शकते. जर तुमची स्मरणशक्ती कमकुवत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आंब्याचा समावेश करू शकता.
मधुमेहात गोड पदार्थ खाण्यास मनाई आहे. आंब्यामध्ये अँथोसायनिडिन्स नावाचे टॅनिन असते, जे मधुमेहावर उपचार करण्यास मदत करू शकते.
उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या खूप दिसून येतात. जर तुम्हालाही तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आंब्याचा समावेश करू शकता.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )