गणपती बाप्पाला १० दिवस दाखवले जाणारे नैवेद्य!

Published by: जगदीश ढोले
Image Source: PINTEREST

करंजी

खोबरे, गूळ आणि सुका मेवा घालून बनवलेली गोड करंजी नैवेद्यासाठी खास केली जाते.

Image Source: PINTEREST

मोदक

गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ. तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक गुळ-खोबऱ्याच्या सारणाने बनवले जातात.

Image Source: PINTEREST

लाडू

बेसन लाडू, रवा लाडू हे गणेशाच्या नैवेद्यात महत्त्वाचे गोड पदार्थ आहेत.

Image Source: PINTEREST

फलाहार

केळी, डाळिंब, द्राक्षे, सफरचंद अशा फळांचा नैवेद्य नेहमी ठेवला जातो.

Image Source: PINTEREST

पंचामृत

दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून बनवलेले पंचामृत बाप्पाला प्रिय आहे.

Image Source: PINTEREST

केळीचा नैवेद्य

गणपतीला केळी खूप आवडतात अशी मान्यता आहे. केळी अर्पण केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.

Image Source: PINTEREST

छप्पन भोग

यामध्ये 56 विविध प्रकारची मिठाई असते या दिवशी गणपतीला शुद्ध आणि सात्विक भोजनाचा विशेष नैवेद्य अर्पण केला जातो.

Image Source: PINTEREST

श्रीखंड

दह्यापासून बनवलेले श्रीखंड हे बाप्पाच्या नैवेद्यातील खास गोड पदार्थ आहे. केशर, वेलदोड्याच्या सुवासाने ते अधिक स्वादिष्ट बनते.

Image Source: PINTEREST

खीर

दुधात तांदूळ शिजवून, साखर आणि सुका मेवा घालून बनवलेली खीर ही गणपती बाप्पाची अतिशय प्रिय गोड पदार्थांपैकी एक आहे.

Image Source: PINTEREST

पुरणपोळी

चण्याच्या डाळीचं पुरण, गूळ आणि वेलदोड्याचा सुगंध यामुळे पुरणपोळी ही बाप्पाला अर्पण केली जाणारी पारंपरिक खास नैवेद्य आहे.

Image Source: PINTEREST

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: PINTEREST