संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, तुमच्या स्वयंपाकघरातील मसाले तुमच्या हदयासाठी हानिकारक असू शकतात. अर्धवट हायड्रोजनेटेड तेल किंवा ट्रान्स फॅट्स असलेल्या पदार्थांपासून सावध रहा. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. उच्च-सोडियम मसाले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा वापर मर्यादित करा. जास्त प्रमाणात मिठाच्या सेवनाने उच्च रक्तदाब होऊ शकतो. साखरयुक्त पेये, कँडी आणि मिठाई यांसारखे जास्त साखर असलेले पदार्थ खाणे कमी करा. तळलेले पदार्थ, बेकिंग केलेले पदार्थ खाणे टाळा. प्रक्रिया केलेले मांसाचे सेवन मर्यादित करा. तुमच्या शरीराला लागेल तितकाच आहार घ्या अति आहाराचं सेवन करू नका. संतुलित आहारासाठी आहारात विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.