स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना, काहीवेळा भांडी जळतात. जळलेली भांडी साफ करणे अवघड काम असते. तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या टिप्स वापरु शकता. टोमॅटो पेस्ट टोमॅटोची पेस्ट जळलेल्या भागावर लावावी , काही वेळ तशीच राहू द्यावी आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवावी लागेल. सोडाचा वापर पाण्यात सोडा मिसळून पेस्ट बनवा, नंतर जळलेल्या भागावर लावा. काही वेळाने भांडी धुवावीत. व्हिनेगर वापरा तुम्ही व्हिनेगर वापरू शकता,भांडी सहज स्वच्छ होतील. जळलेली भांडी लगेच धुवू नका. भांडी धुवताना जास्त कडक ब्रश वापरू नका. यामुळे भांडी खराब होऊ शकतात.