आजकाल प्रत्येकाला मऊ, नितळ आणि डागमुक्त चमकणारी त्वचा हवी असते .
काही घरगुती उपाय केल्यानेही तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी होऊ शकते.
हळद हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. हळद त्वचेला केवळ चमक देत नाही, तर वचेला टवटवीत बनवते आणि निस्तेज त्वचेला दूर ठेवते.
मध त्वचेला हायड्रेट ठेवते. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म संक्रमणापासून दूर राहण्यास मदत करतात आणि घरातील डाग आणि मुरुम देखील कमी करतात.
ऑलिव्ह ऑइल त्वचेचे वृद्धत्व कमी करते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइल लावल्याने चेहऱ्याला छान चमक येते.
संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. संत्र्याचा रस त्वचेला ताजेतवाने करण्यास मदत करतो आणि काळे डाग आणि मुरूमांवर नियंत्रण ठेवतो.
कच्चं दूध हे सुंदर त्वचा मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे. कच्चं दूध चेहऱ्याला लावल्याने त्वचा चमकदार बनते.
बेसन हे नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते सनचा पॅक चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळतो.
दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचेसाठी चांगले असते. दही आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि सुरकुत्या,बारीक रेषा आणि टॅन कमी करण्यास मदत करते.
कोरफडमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेसाठी चांगले असतात. कोरफड त्वचेला मुलायम ठेवते. नियमितपणे कोरफड वापरल्यास त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )