दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतंय कोण्याही ऋतूत दही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं दररोज आहारात दह्याचा समावेश करणं आरोग्यदायी आहे. पण, फक्त रात्री दही खाणं टाळण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात खरं तर रात्री दही खावं की नाही, हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं कारण, प्रत्येकाच्या शारीरिक मर्यादा वेगवेगळ्या असतात. काहींना रात्री दही खाल्यानं त्रास होणार नाही, पण काहींना याचा त्रास होऊ शकतो. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात अनेकजण रात्री दही खाणं टाळतात रात्री दही खाल्यानं अनेकांना पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात. काहींना तर रात्री दही खाल्यानं सर्दी, खोकला आणि अगदी कणकणही जाणवू शकते.