मेथी लोह, मॅग्नेशियम, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे चांगले स्त्रोत आहे.
रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
मेथीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.
मेथीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते ज्यामुळे मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधक समस्या दूर राहतात.
रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
नियमितपणे मेथीचे पाणी प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
नियमितपणे मेथी पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुमे कमी होतात आणि नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
मेथीच्या पाण्यात असलेल्या अँटिऑक्सिडंटसमुळे शरीराचे रोगांपासून संरक्षण होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
मेथीचे पाणी केस गळणे कमी करते आणि केसांची वाढ उत्तेजित करते.
1 चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी गाळल्यानंतर हे पाणी रिकाम्या पोटी प्या.