झोपण्याच्या काही तास आधी काही गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

या गोष्टींमुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येतो आणि तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

Image Source: pexels

गोड पदार्थ

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते मात्र झोपण्यापूर्वी गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि याचा तुमच्या झोपेवर वाईट परिणाम होतो.

Image Source: pexels

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट हे एक हाय एनर्जी फूड आहे ज्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि झोप येण्यात अडथळे निर्माण होतात.

Image Source: pexels

मसालेदार पदार्थ

झोपण्यापूर्वी मसालेदार अन्न खाल्ल्याने तुम्हाला आम्ल रिफ्लक्स, छातीत जळजळ या समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे झोपेचा त्रास निर्माण होऊ शकतो.

Image Source: pexels

सोडा

झोपण्याआधी सोडा पिणे टाळावे यामुळे पोट फुगणे किंवा गॅस होणे या समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला झोप येणे कठीण होते.

Image Source: pexels

चहा आणि कॉफी

चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते, झोपण्याअगोदर कॅफिनचे सेवन केल्यास तुमच्या झोपेवर परिणाम होतो.

Image Source: pexels

मद्यपान

मद्यपान करणे आरोग्यासाठी फार वाईट असते. झोपण्यापूर्वी मद्यपान केल्याने झोपेमध्ये व्यत्यय येतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जास्त थकवा जाणवू शकतो.

Image Source: pexels

जंक फूड

जंक फूडमध्ये भरपूर कॅलरी असतात ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात आणि झोपेचा त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

चीज

चीजमध्ये असलेले अमिनो अॅसिड मेंदूला जास्त वेळ सतर्क ठेवते यामुळे लवकर झोप लागत नाही.

Image Source: pexels