डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर 'हे' काम करा

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

सततचा मोबाईल, टीव्ही स्क्रिनचा वापर यामुळे उद्भवणारी सर्वसामान्य समस्या म्हणजे, डोळ्यांचा कोरडेपणा.

Image Source: pexels

दररोज सकाळी उठल्यावर कोरड्या पडलेल्या डोळ्यांमुळे त्रास होत असेल, तर काही सवयींचा अवलंब करा.

Image Source: pexels

सकाळ उठल्याबरोबर डोळे थंड पाण्यानं धुतल्यास डोळ्यांचा कोरडेपणा कमी होऊ शकतो.

Image Source: pexels

हलक्या हातानं डोळ्यांच्या पापण्यांचा मसाज केल्यानंही खूप आराम मिळतो.

Image Source: pexels

गुलाब पाण्यामध्ये कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो.

Image Source: pexels

सकाळच्या वेळी डोळे मिटून 2 मिनिटं ध्यान केल्यानंही तुम्हाला फायदा होईल.

Image Source: pexels

पुरेशी झोप घ्या, कमी झोप डोळ्यांना कोरडं करते

Image Source: pexels

कोमट पाण्यात मीठ टाकून वाफ घ्या. त्यामुळे डोळे स्वच्छ राहतात आणि आरोग्य सुधारतं.

Image Source: pexels

डोळे सतत कोरडे पडत असतील आणि त्यामुळे खूपच त्रास होत असेल, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Image Source: pexels

(टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)