देशातील अनेक राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी असली तरी दिवाळीत काही राज्यांमध्ये अजूनही फटाके फोडले जात आहेत. काही लोकांना दिवाळीत फटाक्यांचा आवाज आवडत नाही कारण ते गोंगाट आणि मोठ्या आवाजाच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात. विशेषत: वृद्ध आणि लहान मुलांना या आवाजांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या गोंगाटापासून तुम्ही स्वतःला कसे वाचवू शकता? घरात एक शांत जागा शोधा- घराच्या आतील खोल्यांमध्ये राहावे जेथे बाहेरचा आवाज लवकर पोहोचू शकत नाही. पुस्तके वाचू शकता, हेडफोन लावून संगीत ऐकू शकता. दीर्घ श्वास घ्या - फटाके तणाव वाढवतात, काहींना डोकेदुखीचा त्रासही होतो. हे टाळण्यासाठी, आपण दीर्घ श्वास घेऊ शकता. ध्यान - फटाक्यांचा आवाज जास्त वाटत असेल, तर तुम्ही शांत खोलीत ध्यान करू शकता. काही मंत्रांचा जप देखील करू शकता. अरोमाथेरपी- विशिष्ट सुगंधी तेलांच्या मदतीने वातावरणात शांतता राखण्याचा प्रयत्न केला जातो. घरात सुगंधित मेणबत्ती ठेवू शकता. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करा - आवाजाचा त्रास होत असेल तर मग दिवाळीत असे काही उपक्रम करावे, ज्याने तुमचे मन शांत होईल.