संशोधनानुसार झोपेच्या सवयी आणि वजन यामध्ये थेट संबंध आहे.
Image Source: pinterest
उशिरा झोपणं, पुरेशी झोप न होणं किंवा रात्री अचानक उठणं – हे सगळं शरीरातील हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम करतं.
Image Source: pinterest
विशेषतः 'घ्रेलिन' आणि 'लेप्टिन' हे हार्मोन्स जे भूक आणि तृप्ती नियंत्रित करतात ते असंतुलित होतात.
Image Source: pinterest
यामुळे दिवसभर भूक जास्त लागते, क्रेव्हिंग्स वाढतात आणि त्यामुळे अति खाणं होतं.
Image Source: pinterest
शिवाय झोप कमी झाली की शरीराचं मेटाबोलिज्म देखील मंदावतो, ज्यामुळे खाल्लेलं अन्न लगेच चरबीमध्ये रूपांतरित होतं.
Image Source: pinterest
त्यामुळे वजन कमी करायचं असेल, तर आहार आणि व्यायामासोबत झोपेचं व्यवस्थापन देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
Image Source: pinterest
दररोज कमीत कमी 7–8 तास शांत झोप घेणं, ठराविक वेळेला झोपणं आणि मोबाईल स्क्रीनपासून लांब राहणं – हे सर्व उपाय तुमच्या फिटनेसच्या प्रवासात नक्कीच मदत करतील!
Image Source: pinterest
कमी झोपेमुळे स्ट्रेस लेव्हल वाढतो. शरीरात ‘कॉर्टिसोल’ नावाचा तणाव हार्मोन वाढतो, जो पोटाभोवती चरबी साठण्याचं मुख्य कारण असतो.
Image Source: pinterest
उशिरापर्यंत जागरण केल्याने आपण नकळत जास्त वेळा खायला लागतो. हे मिडनाईट बिंजिंग वजन वाढवण्यासाठी पुरेसं असतं.
Image Source: pinterest
वजन कमी करायचं असेल, तर फक्त डायट आणि व्यायाम पुरेसं नाही – योग्य झोपसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.
Image Source: pinterest
झोप ही तुमच्या फिटनेस जर्नीची 'गुप्त चावी' ठरू शकते
Image Source: pinterest
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)