अलिकडे युवकांमध्ये बीयर प्यायचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. लग्न असो वा वाढदिवस, कार्यक्रमात बियरची रेलचेल दिसून येते. बीयर प्यायल्याने काही फायदे आहेत तर काही नुकसानही आहे. त्यामुळे एका महिन्यात किती बीयर प्यायचे याचेही प्रमाण तज्ज्ञांकडून सांगितले जाते. एका दिवसात एक ग्लास बीयर पिऊ शकता. त्यानुसार महिन्यामध्ये नियंत्रित प्रमाणात बीयर पिऊ शकता. एका आठवड्यात 5 ते 14 ग्लास बीयर पिऊ शकता असं काही तज्ज्ञ सांगतात. यापेक्षा जास्त प्रमाणात बीयर प्याल तर ते नुकसानकारक ठरू शकतं. एबीपी माझा या बातमीची पुष्टी करत नाही. हे अभ्यास आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे.