जरी तुमचे काम सात वाजता संपले असेल तरी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, कुटुंबातील सदस्यांबरोबर तसेच शेजाऱ्यांबरोबर तुमच्या कामाविषयी बोलत असता.
कामापासून ब्रेक घेण्यासाठी सुट्टी असते ज्यामुळे आपण स्वत:ला वेळ देऊ शकतो पण सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही मेल तपासत असाल, तर हे चुकीचे आहे.
तुम्हाला अति काम करायची इच्छा नसते. परंतु काही कारणांमुळे तुम्ही बोलत नाही आणि प्रत्येक जण त्याचा फायदा घेत तुमच्यावर काम सोपवतात.
अनेक जण डेडलाइन पूर्ण करण्याच्या नादात ऑफिसवरून घरी आल्यानंतर पुन्हा काम करतात.
आठवड्याची सुट्टी असो किंवा तुम्ही चार पाच किंवा त्यापेक्षा जास्त दिवस सुट्टीवर असाल तर तुम्ही ऑफिसचे ग्रुप बंद ठेवत नाही .
जरी तुमचे काम संपले तरी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांबरोबर ऑफिस पॉलिटिक्सविषयी चर्चा करता.