जोडीदार थोडा वेळ दूर गेला तरी अस्वस्थता जाणवते. मनात सतत त्याच्याबद्दल विचार सुरू असतो.
एकटं राहण्याची वेळ आली की मनावर भीतीचा अंधार पसरतो. ही भावना मनाच्या स्थैर्यावर परिणाम करू शकते.
जोडीदाराने रिप्लाय न दिल्यास नकारात्मक विचारांचे लाट येतात. काही चुकलं का? असं वारंवार वाटतं.
स्वतःचा तणाव अनावश्यक रागातून बाहेर येतो. नात्यात गरज नसताना तणाव निर्माण होतो.
पोटदुखी, डोकेदुखी, थकवा ही मानसिक अस्वस्थतेची शारीरिक लक्षणं असू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्य बिघडू शकतं.
संपूर्ण वेळ, भावना आणि उर्जा फक्त एकाच व्यक्तीवर खर्च होतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ मिळत नाही.
जोडीदार ऑनलाईन आहे का, कुणासोबत आहे, यावर लक्ष ठेवण्याची सवय निर्माण होते. हे विश्वास कमी करतं आणि मनाला थकवतं.
स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा जोडीदाराची गरज वाटते. ही सवय हळूहळू आत्मविश्वास कमी करते.
नृत्य, वाचन, चित्रकला यासारख्या गोष्टींमध्ये वेळ घालवा. यामुळे मन स्थिर राहतं आणि चिंता कमी होते.
जर ही चिंता तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असेल, तर मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्या. नातं टिकवण्याइतकंच स्वतःचं मानसिक आरोग्यही महत्त्वाचं आहे.