सध्या टॅटू हा फॅशनचा अत्यावश्यक भाग बनला आहे आणि अनेक तरुण वर्ग याकडे आकर्षित झाला आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: unsplash

काही लोक आपल्या आवडीनुसार नाव, चिन्ह किंवा खास डिझाईन्स टॅटूच्या माध्यमातून आपल्या शरीरावर कोरून घेतात.

Image Source: unsplash

बरेच जण एक नव्हे तर अनेक टॅटू करून घेतात, आणि ही गोष्ट एक स्टाईल स्टेटमेंट बनली आहे.

Image Source: unsplash

टॅटू काढल्यानंतर त्याची नीट काळजी घेणे आवश्यक असते, विशेषतः सुरुवातीच्या काही दिवसांत.

Image Source: unsplash

नव्याने काढलेल्या टॅटूवर लावण्यासाठी सुगंधरहित (fragrance-free) आणि त्वचेला श्वास घेऊ देणारा (breathable) मॉइश्चरायझर वापरणे सर्वात योग्य मानले जाते.

Image Source: unsplash

मॉइश्चरायझर फक्त एक पातळ थर लावावा; खूप जास्त प्रमाणात लावल्यास त्वचेवर चिकटपणा निर्माण होऊ शकतो आणि संसर्गाचा धोका वाढतो.

Image Source: unsplash

हे मॉइश्चरायझर टॅटूला धूळ, घाण आणि जंतूंंपासून संरक्षण देते, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

Image Source: unsplash

यामुळे त्वचेला होणारी जळजळ, खाज आणि सूज यावर नियंत्रण मिळवता येते.

Image Source: unsplash

पहिल्या 3-4 दिवसांत दररोज 2-3 वेळा हलक्या प्रमाणात मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे, जेणेकरून टॅटू व्यवस्थित भरू शकतो आणि त्वचा लवकर बरी होते.

Image Source: unsplash

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: unsplash