त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे असते.

वृद्धत्वविरोधी पदार्थांमध्ये प्रामुख्याने विविध जीवनसत्त्वे, इलाजिक ऍसिड आणि नैसर्गिक कोलेजन बूस्टर असतात.

Image Source: pixels

एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंटस् असतात जे त्वचेला पोषण देण्यास मदत करतात यामुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.

Image Source: pixels

आवळा

आवळा हा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटस् चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. आवळा त्वचेच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवतो आणि निरोगी त्वचेला प्रोत्साहन देतो.

Image Source: pixels

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे चॉकलेट्स असतात जे त्वचेचे सूर्यप्रकाशापासून रक्षण करतात आणि तरुण दिसण्यासाठी योगदान देतात.

Image Source: pixels

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये दाहक-विरोधी आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात आणि यामध्ये फायबर आणि कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असते जे सर्वोत्तम अँटी-रिंकल अँटीऑक्सिडंट आहे.

Image Source: pixels

टोमॅटो

टोमॅटो आणि टोमॅटोच्या रसामध्ये लाइकोपीनचे प्रमाण जास्त असते, टोमॅटो त्वचेचे सूर्यकिरणांपासून रक्षण करतात.

Image Source: pixels

डाळिंब

डाळिंब हे डाळिंब हे वृद्धत्वविरोधी टॉनिक आहे. हे तुम्हाला तरुण दिसण्यास मदत करू शकते.

Image Source: pixels

रताळे

रताळे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असते. रताळे खराब झालेले कोलेजन पुनरुज्जीवित करून बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर करण्यास मदत करते.

Image Source: pixels

डार्क चॉकलेट्स

कमी प्रमाणात डार्क चॉकलेट्स खाल्ल्याने त्वचेला फायदे होतात, डार्क चॉकलेट्समध्ये अँटीऑक्सिडंटस् आणि मॅग्नेशियम चे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्वचा लवचिक राहण्यास मदत होते.

Image Source: pixels