दातांच्या स्वच्छतेची कमतरता, हिरड्यांमध्ये सूज किंवा जंतूसंसर्ग अशी दातदुखीचे अनेक कारणे आहेत.
स्वयंपाकघरातील काही वस्तूंचा वापर करून तुम्ही दातदुखीच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.
मीठ आणि गरम पाण्याने 30 सेकंदपर्यंत गुळण्या करणे.
लवंग चावून दात दुखत असलेल्या भागावर ठेवणे.
लवंग चावल्याने दातातील बॅक्टेरियाचा नाश होतो.
लसणाची पाकळी चिरून त्याचा रस दुखऱ्या भागावर ठेवणे.
एका कापडात बर्फाचे तुकडे गुंडाळा आणि गालाच्या बाहेरील भागावर 10 ते 15 मिनिटे शेक देणे.
हळदीमध्ये पाणी किंवा मध मिसळून पेस्ट तयार करा आणि दाताच्या दुखऱ्या भागावर ठेवा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.