स्वातंत्र्य संग्रामातील 10 क्रांतीकारी पुस्तके, ज्यांनी इतिहास घडवला!
Published by: जयदीप मेढे
Image Source: Wiki Pedia
हिंद स्वराज (भारतीय स्वराज्य) – महात्मा गांधी:हे पुस्तक 1909 साली गांधीजींनी लिहिलं. ब्रिटिशांनी त्यावर बंदी घातली होती. यात त्यांनी अहिंसा, स्वावलंबन आणि स्वतंत्र भारताचं स्वप्न मांडलं.
Image Source: Wiki Pedia
द डिस्कव्हरी ऑफ इंडिया – जवाहरलाल नेहरू: नेहरूंनी हे पुस्तक तुरुंगात असताना लिहिलं. यात भारताचा इतिहास, संस्कृती आणि स्वातंत्र्याची वाटचाल समजावून सांगितली आहे.
Image Source: Wiki Pedia
द इंडियन स्ट्रगल – सुभाषचंद्र बोस: या पुस्तकात नेताजींनी स्वातंत्र्य चळवळीविषयी आपली मते आणि एक मुक्त भारत कसा असावा, हे मांडलं आहे.
Image Source: Wiki Pedia
इंडिया विन्स फ्रीडम – मौलाना अबुल कलाम आझाद: या पुस्तकातून आझाद यांनी स्वातंत्र्याच्या अगोदर घडलेल्या महत्त्वाच्या घटना, चर्चा आणि निर्णय यांचे स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत.
Image Source: Wiki Pedia
फ्रीडम अॅट मिडनाईट – लैरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लापिएर: या पुस्तकात ब्रिटिश राजवटीचा शेवटचा वर्ष आणि भारत-पाक फाळणीचं सविस्तर चित्रण आहे.
Image Source: Wiki Pedia
इंडिया आफ्टर गांधी – रामचंद्र गुहा: भारत स्वतंत्र झाल्यानंतरची राजकीय आणि सामाजिक वाटचाल या पुस्तकात सांगितली आहे.
Image Source: Wiki Pedia
माझ्या सत्याचे प्रयोगांची गोष्ट – महात्मा गांधी: हे गांधीजींचं आत्मचरित्र आहे. त्यांनी आपले विचार, अनुभव आणि जीवनातील प्रयोग यात मांडले आहेत.
Image Source: Google Images
इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स – बिपिन चंद्रा: 1857 च्या उठावापासून ते 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्याचा सविस्तर इतिहास या पुस्तकात आहे.
Image Source: Penguin House India
अन्टू धिस लास्ट – जॉन रस्किन: या पुस्तकाने गांधीजींच्या आर्थिक स्वावलंबन आणि शांततेच्या विचारांवर मोठा प्रभाव टाकला.
Image Source: WikiPedia
सिव्हिल डिसओबिडियन्स – हेन्री डेव्हिड थोरो: अन्यायकारक कायद्यांना विरोध करण्यासाठी शांततामय मार्ग कसा वापरावा, हे या लेखात सांगितलं आहे. हा विचार भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणादायक ठरला.