बीट

उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यास दररोज बीट खावे.

गाजर

गाजर रक्तवाहिन्यांना आराम देते आणि सूज कमी करते.

पिस्ता

पिस्ता हृदयासाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण असून बीपीच्या त्रासात फायदेशीर ठरतो.

ओवा

ओवा रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

लिंबू

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आंबट पदार्थांचे सेवन करावे..

लसूण

लसूण रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यास मदत करते त्यामुळे बीपी नियंत्रणात राहते.

काकडी

काकडीच्या सेवनाने उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो.

बटाटा

सालीसह उकडलेल्या बटाट्याचं सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

दुधी

दुधीच्या रसामध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि फायबर असते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.