नारळाच्या पाण्यात 94 टक्के पाणी आणि फारच कमी फॅट असते.
त्यात मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात.
एक कप नारळाच्या पाण्यात 60 कॅलरीज असतात.
काही संशोधनातून असे दिसून आले आहे की नारळाचे पाणी प्यायल्याने किडनी स्टोन कमी होतो.
दररोज नारळपाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि मुतखडा तयार होण्यासही प्रतिबंध होतो.
नारळाच्या पाण्यातील हायड्रेटिंग गुणधर्म त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे
नारळपाणी प्यायल्याने त्वचेवर देखील चांगला ग्लो येतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.