अंगशुमन चौधरी या कलाकाराने AI च्या माध्यमातून बनवलेले काही फोटो खूप व्हायरल होत आहेत.



अंगशुमन चौधरी यांनी कोलकाता आणि दिल्लीची बर्फाच्छादित छायाचित्रे तयार केली.



सोशल मीडिया फोटो शेअर करतांना अंगशुमन ने लिहिले की -



'जोरदार बर्फवृष्टीदरम्यान नवी आणि जुनी दिल्ली कशी दिसेल? असा मला नेहमीच प्रश्न पडायचा आणि आता AI ने मला ते दृश्य बनवण्यास मदत केली.'



त्यांनी दिल्लीचे प्रसिद्ध इंडिया गेट आणि जुन्या दिल्लीच्या भागातील जुने गेट यांची छायाचित्रे AI मार्फत तयार केली.



बर्फाने झाकलेली दोन्ही चित्रे एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी खरी वाटत आहे.



अंगशुमन चौधरीने आणखी दोन फोटो शेअर केले आहेत.



दुसऱ्या फोटोमध्ये कोलकात्यात बर्फवृष्टी झाली आहे याचे चित्रण केले आहे.



फोटोमध्ये इतर प्रेक्षणीय स्थळांसह बर्फाने झाकलेली ट्राम दिसत आहे.



या पोस्टवर हजारो लाईक्स आणि अनेक कमेंट्स करण्यात आल्या आहेत.