राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सुमारे 8000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनावेळी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

राम मंदिराच्या उद्घाटनावेळी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

मंदिरात प्रवेश करणाऱ्यांना मोबाईल,पर्स,इअर फोन,रिमोट चावी असे कोणतेही गॅझेट घेऊन जाण्याची परवानगी नाही.

ज्येष्ठ संतांना त्यांचे छत्र,पिशवी,सिंहासन, गुरु पादुका वैयक्तिक पूजेसाठी या गोष्टी नेण्यास मनाई असेल.

मिळालेल्या माहितीनुसार,निमंत्रण पत्रावर ज्या व्यक्तीचे नाव असेल त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल.

रामलालाच्या अभिषेकासाठी येणाऱ्या पाहुण्यांना 22 जानेवारीला सकाळी 11.00 वाजेपूर्वी कार्यक्रमस्थळी प्रवेश करावा लागेल.

निमंत्रण पत्र आणि ड्युटी पास असलेलेच अयोध्येत प्रवेश करू शकतील.

मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिर परिसरातून बाहेर पडल्यानंतरच संतांना रामलालाचे दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.