दररोज काजळ किंवा सुरमा वापरणं डोळ्यांसाठी नुकसानदायक ठरु शकतं.
डोळ्यात संसर्ग असल्यास काजळ लावू नये, कारण त्यामुळे डोळ्यांना जळजळ होते आणि संसर्गही वाढतो.
मस्करामुळे पापण्यांना संसर्ग होऊ शकतो.
काजळ, मस्करा, किंवा सुरमा यांचा दररोज वापर केल्याने अंधत्व येऊ शकतं.
कॉर्नियल अल्सर, ग्लूकोमा ड्राय आय सिंड्रोम असे डोळ्यासंबंधित आजार होऊ शकतात.
काजळमध्ये असलेल्या काही रसायनांमुळे डोळ्यांच्या आत जळजळ किंवा जखम होऊ शकते.
काजळमधील रासायनिक घटकांमुळे डोळ्यातील दाब वाढवू शकतात, ज्यामुळे ग्लूकोमा आजार होण्याची शक्यता वाढते.
दररोजच्या काजळ वापरल्यामुळे अश्रू ग्रंथींना नुकसान पोहोचू शकतं, ज्यामुळे डोळा ड्राय आय सिंड्रोम होऊ शकतो.
एक्सपायरी डेटनंतर कोणतीही सौंदर्यप्रसाधने वापरू नका. विशेषता डोळ्यांसाठी ते घातक ठरते.
बाजारातील अति रसायनयुक्त काजळ लावू नका, नैसर्गिक पदार्थांचा समावेश असलेले काजळ वापरा.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.