अचानक आपल्या पोटात दुखायला कि आपण ओवा खातो
असं म्हणतात पोटदुखी ओवा खाल्यावर बरी होते
एखादा डाळीचा पदार्थ बनवत असाल तर, त्या चिमुटभर ओवा टाकावा
त्यामुळे पोटात गॅस समस्या होत नाही
शौचास न होणे किंवा पोट फुगणे समस्या होत असल्यास चिमुटभर ओवा खावा
पोटात जळजळ होत असल्यास ओवा आणि मध एकत्र करून खावं
ओवा खाल्यावर भरपूर प्रमाणात पाणी प्यावं
ओवा हा उष्ण असतो त्यामुळे आपल्याला तोंड येणं अशी समस्या येऊ शकते
वारंवार लघवी होत असल्यास गुळ आणि ओवा एकत्र करून खावं
कोणताही वैद्यकीय उपाय करण्याआधी पडताळी करणं गरजेचं आहे