भारतात अनेक वर्षांपासून बडीशेप वापरली जात आहे.

अनेक खाद्य पदार्थांमध्ये बडीशेपचा वापर केला जातो.

पण यापासून होणारे फायदे तुम्हला माहितीयेत का?

बडीशेप मध्ये पोट्याशियम, आयर्न या सारखे पोषक घटक आढळतात.

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी हे पोषक घटक महत्त्वाचे असतात.

डोळ्यांच्या ऊतींना ऑक्सिजन पोहोचवण्यात लोह महत्त्वाची भूमिका बजावते,

बडीशेपचे सेवन केल्यास डोळ्यांना योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी पोषक तत्वे मिळू शकतात.

डोळ्यांवर सूज येणे, डोळे कोरडे पडणे या सारख्या समस्यांवर बडीशेप फायदेशीर ठरू शकते.

त्यामुळे आहारात बडीशेपचा समावेश करायला हवा.

तुम्हालाही डोळ्यांसंबंधी समस्या असल्यास तुम्ही आहारात बडीशेपचा समावेश करू शकता.