'भाबी जी घर पर हैं' (Bhabi Ji Ghar Par Hai) ही कॉमेडी मालिका 2015 पासून छोट्या पडद्यावर प्रसारित होत आहे.
या टीव्ही मालिकेत एकापेक्षा एक धमाल व्यक्तिरेखा पाहायला मिळतात
आणि ही मालिका पाहिल्यानंतर प्रेक्षकही पोट धरून हसतात. मात्र, या टीव्ही मालिकेशी एक वादही निर्माण झाला आहे.
या टीव्ही मालिकेत अभिनेत्री शिल्पा शिंदे 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारत होती.
शिल्पामुळे ‘अंगुरी भाभी’ ही व्यक्तिरेखा घरोघरी प्रसिद्ध झाली.
शिल्पाचा अभिनय आणि तिचा बोललेला डायलॉग 'सही पकडे है' प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता.
आपली ही लोकप्रियता पाहून शिल्पाने मालिकेच्या निर्मात्यांना फी वाढवण्याची मागणी केली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी ही मागणी फेटाळून लावली, परिणामी शिल्पा आणि 'भाबी जी घर पर हैं' च्या निर्मात्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि अभिनेत्रीने ही मालिका सोडली.