Yami Gautam : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामी गौतमचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. यामी शनिवारपासून इंस्टाग्राम अॅक्सेस करू शकलेली नाही. त्यामुळे तिने ट्वीट करत चाहत्यांना सावध केले आहे. यामीने ट्वीट करत लिहिले आहे, मी शनिवारपासून माझं इंस्टाग्राम अकाऊंट अॅक्सेस करू शकलेली नाही. आता ते रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. यामी आधी अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. यामीचा 'दसवीं' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नोरा अभिषेक बच्चनसोबत दिसणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (photo:yamigautam/ig)