एवोकॅडो (Avocado) हे एक असं फळ आहे, ज्यामध्ये फॅटी अॅसिड खूप प्रमाणात आढळतात. एवोकॅडो हे वजन वाढविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुकत असं फळ आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार आठवड्यातून दोन वेळा एवोकॅडो खाल्ल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो. हा अभ्यास जर्नल ऑ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे प्रत्येक आठवड्यात किमान दोन एवोकॅडो खाल्ल्यास रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका 16 टक्के कमी होतो. आश्चर्यकारक बाब म्हणजे एवोकॅडो रक्त शुद्धीकरण करतं. ज्यामुळे आपली अनेक रोगांपासून स्वाभाविकपणे मुक्तता होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.