ऋतुजा बागवेने अनेक नाटकांत, मालिकांमध्ये आणि सिनेमांत काम केलं आहे.

'शहीद भाई कोतवाल' या सिनेमाच्या माध्यमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.

'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'नांदा सौख्य भरे', 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेच्या माध्यमातून तिला घराघरांत लोकप्रियता मिळाली आहे.

'अनन्या' या नाटकाने तिला नवी ओळख मिळाली.

ऋतुजा बागवेचं अनन्या हे नाटक प्रचंड गाजलं.

अनन्या या नाटकातील अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

दिग्गजांनीदेखील ऋतुजाचं कौतुकदेखील केलं आहे.

ऋतुजा बागवे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

ऋतुजा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

ऋतुजाने अनन्या नाटकाचे 300 हून अधिक प्रयोग केले आहेत.