राज्याच्या गृहखात्यावर ढीगभर प्रश्न आणि भलामोठा ठपका ठेवून मोकाट फिरणारा ड्रग्जमाफिया ललित पाटीलला मुंबई पोलीसांनी अटक केली. पण ललित पाटील प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. काल ललित पाटीलचे फाईव्ह स्टारमधील फोटो समोर आले. तर आज ललित पाटील या ड्रग्जच्या काळ्या धंद्यातून लाखो रूपये कमवत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. ललित पाटीलच्या महिन्याच्या रकमेचा (Lalit Patil Monthly Income) आकडा ऐकून डोक गरगरेल सर्वसामान्य व्यक्तीला आयुष्यभर नोकरी करून जेवढे कमवता येणार नाही तेवढी कमाई तर ललित पाटीलची महिन्याची आहे. ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील त्यांच्या नाशिकमधील ड्रग्ज फॅक्टरीतून दर महिन्याला 50 लाखंचा निव्वळ नफा कमवायचे ही माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. 2021 सालापासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचं उत्पादन सुरू होता. दर महिना 50 किलो एमडीची निर्मिती करायचे.