गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली.

अगदी पारंपारिक पद्धतीने राजाची पहिली झलक दाखवण्यात आली.

यावेळी शिवाजी महारांजा काळ हा नृत्याविष्कार करुन दाखवण्यात आला.

यंदाचं लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे.

गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात माहित आहे.

लालबागचा राजाची विशेष ख्याती आहे.

त्याचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक लालबागमध्ये दाखल होत असतात.

इतकच नव्हे अगदी राजकारण्यांपासून ते मोठमोठ्या सिनेतारकांपर्यंत सर्व जण लालबागच्या चरणी लीन होतात.

त्याच राजाची शुक्रवार (15 सप्टेंबर) रोजी पहिली झलक दाखवण्यात आली.

यंदा लालबागच्या राजाच्या दारी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे.