दुर्गाचं भावविश्व रंगवणारी मालिका 'लेक माझी दुर्गा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



14 फेब्रुवारीपासून दररोज संध्या. 7.30 वा ही मालिका प्रेक्षक पाहू शकतात.



प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.



आई आणि मुलीच्या नात्यावर या मालिकेचे कथानक आधारित असणार आहे.



'लेक माझी दुर्गा' ही नवी मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते.



'लेक माझी दुर्गा' ही मालिका 'शक्ती अस्तित्व एक एहसास की' या मालिकेचा रिमेक आहे.



मालिकेत चिमुकली दुर्गा जन्मजात विकृतीमुळे आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसणार आहे.



हेमांगी कवी आणि सुशील इनामदार मुख्य भूमिका साकारणार आहेत.