अभिनेत्री करीना कपूर सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
करीनानं नुकतीच ‘केस तो बनता है’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात तिनं केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
कोर्ट रुम कॉमेडी शो ‘केस तो बनता है’मध्ये करीनानं तिच्या जब वी मेट या चित्रपटाबद्दल सांगितलं.
जब वी मेट हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात करीनानं गीत ही भूमिका साकारली होती.
‘केस तो बनता है’ मध्ये करीना म्हणाली, माझ्या गीत या भूमिकेमुळे रेल्वेला नक्कीच आर्थिक फायदा झाला असेल. तसेच मी या चित्रपटात घातलेल्या हेरम पँटच्या विक्रीमध्ये देखील वाढ झाली असेल. '
करीनानं ‘अब तू सिखाएगा मुझे, सिखडी हूं मैं भटिंडा की, सब आता है मुझे, ट्रेन पकडने से लेकर केस जीतने तक’ हा डायलॉग म्हणून दाखवला.
करीनाबरोबरच अनिल कपूर, वरुण धवन आणि करण जोहर हे कलाकार देखील या शोमध्ये सहभागी होणार आहेत. अॅमेझॉन मिनीट टिव्हीवर प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकणार आहेत.
करीनाचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे.
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटावर नेटकऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे लाल सिंह चड्ढा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.