अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या फोटोवर चाहते आणि सेलिब्रिटी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. विराजस-शिवानीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या नात्याविषयी माहिती दिली होती. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती. कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थित विराजस आणि शिवानीने सात फेरे घे शिवानी आणि विराजस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ते नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. 'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून विराजस घराघरांत पोहोचला होता.