सिने-निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम प्रेक्षक पाहू शकतात. ' कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणआणि रणवीर सिंह हजेरी लावणार आहेत. 'कॉफी विथ करण 8'चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये करण जोहर रणवीर सिंह आणि दीपिकाची मजा घेताना दिसत आहे. करण जोहर आपल्या शैलीत दीपिकाला विचारतो,रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील रॉकी रंधावाला डेट करायला आवडेल का?. यावर उत्तर देत दीपिका म्हणते,मी रॉकी रंधावासोबत लग्न केलं आहे. त्यानंर करण जोहर अभिनेत्रीला विचारतो,रणवीर व्यतिरिक्त तुझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री कोणासोबत चांगली आहे. याचं उत्तर देत अभिनेत्री हृतिक रोशनचं नाव घेते. दीपिका आगामी 'फायटर' या सिनेमात रणवीरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यानंतर रणवीर सिंह खुलासा करत म्हणतो की,2015 मध्ये माझा दीपिकासोबत साखरपुडा झाला होता. यावर हसत अभिनेत्री म्हणते,अॅडव्हान्स बुकिंग.