टोमॅटो केचप खायला सगळ्यानांच आवडते. मात्र टोमॅटो केचप खाणे शरीराकरात धोक्याचे ठरू शकते. याच्या सेवनाने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. टोमॅटो केचपच्या सेवनाने तुमचे वजन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. शरीरातील इंसुलिनचे प्रमाण कमी व्हायला लागते. अॅसिडीटीचे प्रमाण वाढू शकते. यात असणारे फ्रुक्टोज कॉर्न सिरपमुळे गॅसचा त्रास होऊ शकतो. टोमॅटो केचपमध्ये हिस्टामाइन केमिकल असल्याने अॅलर्जी देखील होऊ शकते. केचपमुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. सांधेदुखीची समस्या असेल तर केचप खाऊ नका.