उलट्या-अतिसार आणि फुफ्फुसांच्या समस्या दूर करण्यासाठी कमळ उपयोगी ठरतं.
त्वचेचे रोगही या फुलामुळे कमी होतात.
टॅनिन, जीवनसत्वे अ, ब आणि क या फुलामध्ये आढळतात.
गुलाबांच्या फुलांचा रस शरीरातील उष्णता आणि डोकेदुखी कमी करण्यास मदत करतो.
दमा, खोकला, फुफुसांच्या समस्या, अपचन आणि पाचक समस्या दूर करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या जातात.
जास्वंदी फुलामुळे केस गळणे थांबते.
उच्च रक्तदाब, लूज मोशन, मूळव्याध, खोकला कमी करण्यास हे फुल उपयुक्त ठरते.
ताप, चक्कर, खोकला, मळमळ यांसारख्या आजारांवर चाफा गुणकारी आहे.
चाफ्याच्या फुलांचा काढा शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो.
त्वचेचे आजार, जखमा आणि अल्सर यांसारख्या अनेक आजारांसाठी आयुर्वेदिक औषधात चाफ्याचा वापर केला जातो.