त्वचेची काळजी घेण्यासाठी टोनर वापरणे आवश्यक आहे. टोनर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते. टोनर वापरल्याने कोरड्या त्वचेला ओलावा मिळतो. टोनर वापरत असाल तर तुम्हाला पिंपल्सची समस्या कमी होते. तुम्ही मेकअप काढल्यानंतर टोनरचा वापर करू शकता. मेकअप केला नसेल तर फेस वॉशनंतर टोनर वापरा. यानंतर तुम्ही कोणतेही सीरम किंवा मॉइश्चरायझर लावू शकता. टोनर वापरल्याने चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो. चेहऱ्यावर असलेली घाण टोनरच्या साहाय्याने काढली जाते. नियमीत टोनर वापरल्याने काळेपणा दूर होतो.